Share

बाळासाहेबांचे चिरंजिव एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते

Published On: 

वर्धा :- राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या इशार्‍यावर महाविकास आघाडी निर्माण झाली. खुर्चीसाठी वाट्टेल ते करण्यात बाळासाहेबांचे चिरंजिव म्हणून ओळख असलेले उद्धव ठाकरे एवढ्या खालच्या पातळीवरील राजकारण करतील, असे वाटले नव्हते.

कंगणा राणावत या अभिनेत्रीने केलेल्या टीकेनंतर तिचे कार्यालय पाडणे ही बाब या शिवाजी महाराजांच्या राज्याला कलंक लावणारी आहे. या राज्यात आता ठाकरे सरकारची ठाकुरकी चालणार नाही, अशी व्यवस्था झाल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया माजी खा. सुरेश वाघमारे यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार कोरोनासारखी महामारी सोडून आत्महत्या करणारा चित्रपट अभिनेता सुशांत सिंग आणि आता अभिनेत्री कंगणा राणावत यांच्यावरील आरोप प्रत्यारोपामागे फिरते आहे. चंदेरीदुनियेत हरवून असलेले काही नेते यात अडकून असल्याने राज्य सरकारचे धाबे दणावले आहेत, असेही वाघमारे यांनी कळविले. आज सुडबुद्धीतून केलेल्या कारवाहीचा आपण निषेध करीत असल्याचेही वाघमारे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

अमरावतीतील ‘हे’ धोरण ठरणार ग्रामीण भागातील लोकांसाठी उपयुक्त

‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’

गडचिरोलीतील पुराची अखेर केंद्राने घेतली दखल, अशी होणार पाहणी  

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!