मुंबई : कालचा दिवस राज्याच्या राजकारणात वादळी ठरला आहे. शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना आता तापला असून इतके दिवस शिवसेना खासदार संजय राऊत यांना भिडणाऱ्या कंगनाने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच थेट आव्हान दिले. शिवसेनेकडून मात्र कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली जात नसली तरी कंगनाने आज देखील आपले शाब्दिक युद्ध सुरुच ठेवले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कंगनाने काल जाहीर केलेल्या एका व्हिडिओमध्ये एकेरी उल्लेख केला होता, तसेच याआधी देखील तिने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून उद्धव ठाकरे यांचे बॉलिवूड माफियांशी साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. यासोबतच त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत अपमान देखील केल्याचे दिसून आले होते.
यानंतर आता शिवसेनेने कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असले तरी कंगना रणौत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता कंगना यावर काय प्रतिक्रिया देणार हे देखील महत्वाचं आहे.
कंगनाने आज देखील केला उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख!
कंगना रणौतने “वडिलांची पुण्याई तुम्हाला पैसा देऊ शकते पण सम्मान स्वतःला कमवावा लागतो, माझे तोंड बंद कराल तर माझ्यानंतर लाखोंचा आवाज गुंजेल, कित्येकांचे तोंड बंद कराल? किती जणांचे आवाज दाबाल? कधी पर्यंत सत्यापासून दूर धावाल? तू काहीच नाहीयेस. फक्त वंशवादाचा एक नमुना आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:-
‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’
गडचिरोलीतील पुराची अखेर केंद्राने घेतली दखल, अशी होणार पाहणी
‘मुख्यमंत्र्यांचा अपमान तो महाराष्ट्राचा अपमान, आता गाशा गुंडाळून चालत व्हायचं’

