Share

मुख्यमंत्रीही जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर ; दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – राज्यात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. आस्मानी संकटांमुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. त्यामुळे परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी, शेतकऱ्यांना भेटण्यासाठी सोमवारी (दि.19) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत

सकाळी 09:00 वा.सोलापूर विमानतळ येथे आगमन व मोटारने शासकीय  विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी 09:30 वा.सोलापूर येथून मोटारने सांगवी खूर्द ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकडे प्रयाण (अक्कलकोट मार्गे) , सकाळी 10:45 वा. सांगवी खूर्द येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करतील.

सकाळी 11:00 वा. सांगवी पूलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 11:15 वा. अक्कलकोट शहरकडे प्रयाण, सकाळी 11:30 वा.अक्कलकोट शहर येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी, सकाळी 11:45वा. अक्कलकोट येथून रामपूकडे प्रयाण करतील.

दुपारी 12:00 वा.रामपूर येथे आगमन व अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करतील दुपारी 12:15 वा.रामपूर येथून बोरी उमरगे ता. अक्कलकोटकडे प्रयाण करून दुपारी 12:30 वा.बोरी उमरगे येथे आगमन आपत्तीग्रस्त घरांची व शेतीपीकांच्या नुकसानीची पाहणी करतील.

दुपारी 12:45 वा.बोरी उमरगे ता. अक्कलकोट येथून सोलापूरकडे प्रयाण करून दुपारी 03:00 वा. पूरपरिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा, व अभ्यागताच्या भेटी व नंतरसोलापूर विमानतळ येथे आगमन व मुंबईकडे प्रयाण करतील.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!