🕒 1 min read
नवी दिल्ली : गतविजेता संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील लढतीने यंदाच्या आयपीएल मोसमाची मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधून सुरुवात होणार आहे. 7 एप्रिलला हा सामना खेळवण्यात येईल. यंदाच्या आयपीएल मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. जवळपास दिडमहिन्यांहून अधिक काळ रंगणाऱ्या स्पर्धेतील अंतिम सामना २७ मे २०१८ ला मुंबईच्या मैदानातच रंगणार आहे. या स्पर्धेत खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांची वेळ प्रतिस्पर्धी आणि सामन्याचे ठिकाण पुढील प्रमाणे….
NEWS: VIVO Indian Premier League 2018 fixtures announced
The 11th edition of the world's most popular and competitive T20 tournament will be played at nine venues across 51 days.
Full schedule here – https://t.co/yqVFDc9tTF #IPL2018 pic.twitter.com/qNKraLChA7
— IndianPremierLeague (@IPL) February 14, 2018
आयपीएलच्या ११ व्या सत्रातील सामने ९ मैदानांवर ५१ दिवस रंगतील. दोन वर्षांच्या बंदीच्या कारवाईनंतर पुनरागमन करत असलेल्या सीएसकेच्या घरच्या मैदानावरील सामने चिंदबरम स्टेडियमवर, तर राजस्थान रॉयल्सचे सामने सवाई मानसिंग स्टेडियमवर होतील.आयपीएलच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार यंदाच्या सत्रातील १२ सामने दुपारी चार वाजता आणि ४८ सामने रात्री आठ वाजता सुरू होतील. अंतिम सामना २७ मेला मुंबईत होईल.

गेल्या महिन्यात प्रसारणकर्त्यांनी आग्रह केला होता की, दुपारचा सामना सायंकाळी ५.३०पासून, तर रात्रीचा सामना ७ वाजल्यापासून खेळविण्यात यावा. रात्री उशीरा सामना समाप्त होत असल्याने क्रिकेटचाहत्यांना सार्वजनिक वाहतूक मिळण्यास अडचण येत होती आणि खेळाडूही रात्री उशीराने हॉटेलमध्ये पोहचत असल्याने सामन्याच्या वेळेत बदल करण्याचा आग्रह करण्यात आला होता.त्याचवेळी, बीसीसीआयने सामन्यांची वेळ सध्या कायम ठेवली असून काही फ्रेंचाइजी अद्यापही प्रसारणकर्त्यांसह सामन्यांच्या वेळेत बदल करुन घेण्यासाठी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
