Share

SBI च्या ग्राहकांना ‘या’ तीन गोष्टी टाळण्याचे केले आवाहन

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया ही राष्ट्रीयकृत बँक असून ही देशातील सर्वाधिक विस्तार असलेली बॅंक आहे. या बँकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या बॅंकिंग सेवा, शेती व उद्योगासह सर्वसामान्यांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा केला जातो. तसेच बचतीच्या योजना राबविल्या जातात. गृह कर्जाच्या क्षेत्रातही ही बॅँक आघाडीवर आहे. मात्र एसबीआय बँकच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

KYC च्या नावावर होणाऱ्या फसवणूकीचा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. बँकेने ट्विटर करत हि माहिती ग्राहकांना सांगितली आहे. बँकेने ट्विट करत सांगितले की, ‘KYC व्हेरिफिकेशनच्या नावाखाली फसवणूक करीत आहेत. SBI च्या सर्व ग्राहकांनी 30 जूनपर्यंत KYC करणे बंधनकारक आहे, जर ग्राहकांनी असे  केले नाही त्यांचे बँक खाते निलंबित करण्यात येईल,’ असा इशारा स्टेट बँक ऑफ इंडियाने दिला आहे. ग्राहकांनी बँकेच्या कोणत्याही वेगळ्या वाटणाऱ्या मेसेजला चुकूनही बळी पडू नये आणि KYC साठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. एखाद्या ग्राहकाने तसे केले असेल तर त्याबद्दल त्वरित सायबर क्राइमला कळवा, असेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

खबरदारी म्हणून काय काळजी घ्याल?

  •  कोणत्याही अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा.
  • KYC अपडेट्ससाठी बँक कधीही लिंक पाठवित नाही.
  • आपला मोबाईल आणि पर्सनल डिटेल्स कोणाबरोबरही शेअर करू नका.

KYC डॉक्युमेंट ऑनलाइन अपडेट करण्यासाठी असे करा –

  • KYC अपडेट्ससाठी ग्राहकाला आपला ऍड्रेस प्रूफ आणि आयडेंटिटी कार्ड रजिस्टर्ड ईमेल अथवा पोस्टद्वारे पाठवावे लागेल.
  • डॉक्युमेंट त्याच मेल आयडीवरून पाठवावे जो आपण बँकेत अपडेट केला आहे.
  • त्या ईमेलवरून डॉक्युमेंटची स्कॅन केलेली कॉपी बँक शाखेच्या ईमेल ऍड्रेसवर पाठवावी लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!