Share

देशात प्राथमिक शिक्षण मोफत करण्याची पहिली मागणी सावित्रीबाईंनीच केली- देवेंद्र फडणवीस

Published On: 

पुणे : आज(१४ फेब्रु.)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले(Savitribai Phule) यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. तसेच देशात प्राथमिक शिक्षण मोफत करण्याची पहिली मागणी सावित्रीबाईंनीच केली, असेही फडणवीसांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘आज शिक्षणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात महिला सक्षमपणे वाटचाल करत आहेत. याचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. महाराष्ट्राचे वैचारिक पुढारलेपण ज्या थोर महापुरुषांमुळे आहे, त्यात सावित्रीबाईंचा उल्लेख आवर्जुन करावा लागतो.’ तसेच प्रत्येक पुरुषाच्या यशात स्त्रीचा वाटा असतो. याचे आद्य उदारहण सावित्रीबाई फुले यांचे आहेत. अर्थातच स्त्रीच्या पाठिशी पुरुषही भक्कमपणे उभा राहतो. याचे श्रेय ज्योतिबांना द्यावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!