Share

महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे शोधण्यापेक्षा आपले आमदार सांभाळा ; अजित पवारांचा टोला

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.ती म्हणजे त्यांचे बोलणे अगदी मनाला आले तसे बोलून मोकळे होणारे अजित पवार यांची आज विधानसभेत चांगलेच टोलेबाजी केली.अजित पवार म्हणाले की ‘भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखा नेता सापडणार नाही. ही शोधाशोध करण्याच्या नादात त्यांचे आमदारच फुटतील.

काल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला फसवल्याची चूक मान्य केली होती. तसेच ती चूक दुरूस्त करणे शक्य असल्याचे नमूद करत महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे संकेत दिले होते. त्याचा आज समाचार घेताना अजित पवार यांनी चुकीला माफी नाही, असे चांगलेच समजावून सांगितले.

तसेच त्यांच्या मताला उद्धव ठाकरे यांची संमती असल्याचे सभागृहाला दाखवून दिले. त्यानंतर भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, तुम्ही मध्य प्रदेशप्रमाणे बघत असाल तर ते इथे शक्य नाही. तुमच्या मागच्यांना सांभाळण्याकडे लक्ष द्या, नाहीतर मागचे पटापट गायब होतील.अजित पवार आणि सुधीर मुनगंटीवार यांची जुगलबंदी चांगलीच अनुभवायला मिळाली.

हेही पहा: 

विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेवर सुरजेवाला यांचे वक्तव्य | Randeep Singh Surjewala At Parliment House |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!