🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : शेळीपालनातील नफ्याचे प्रमाण हे करडांच्या संख्येवर, मरतुकीच्या प्रमाणावर ठरते. करडांना सुरवातीला उत्तम प्रतीचे वाळलेले गवत किंवा द्विदल वर्गातील हिरवी वैरण द्यावी. करडू 25 दिवसांचे असल्यापासून थोडा खुराक सुरू करावा.
तसेच चांगल्या वजनाची, सशक्त करडं जन्मण्यासाठी शेळीच्या गाभणकाळातच तिचे योग्य व्यवस्थापन करावे. गाभण शेळ्यांना सहज पचणारा चारा, योग्य प्रमाणात पशुखाद्य द्यावे. या आहारातील पोषणमूल्यांचा वापर गर्भाच्या वाढीसाठी; तसेच शेळीच्या शरीरातील पोषणूल्यांचा साठा वाढविण्यासाठी होईल. याच प्रमाणे जसजसे व्यायण्याची तारीख जवळजवळ येईल तसतसे चाऱ्याव्यतिरिक्त पोषणमूल्यांच्या पुरवठ्यासाठी अधिक खुराकाचा पुरवठा करावा.
याच प्रमाणे गाभण शेळीस गाभणकाळाच्या 90 दिवसांनंतर जादा खुराक देण्याची गरज असते. गाभणकाळात जर उत्तम प्रतीचा चारा व खुराक दिला गेला नसल्यास अशक्य व लहान करडं जन्माला येतात किंवा पिलांचा गर्भाशयातच मृत्यू होतो. गाभणकाळाच्या शेवटच्या 3 ते 4 आठवड्यांमध्ये गर्भाशयातील पिलांच्या उत्तम वाढीसाठी उत्तम प्रतीच्या चाऱ्याबरोबरच दररोज 250 ते 350 ग्रॅम खुराक द्यावा. विशेषतः जुळे किंवा तिळे देणाऱ्या शेळीची गाभणकाळात जास्तीची काळजी घ्यावी.
शेळी व्यायण्यापूर्वी एक महिना अगोदर शेळीस आंत्रविषार लस द्यावी.गाभणकाळातच योग्य ती काळजी घेतल्यामुळे जन्मणारी करडं ही सशक्त, वजनदार, चपळ जन्मतात. या करडांची पुढील वाढही झपाट्याने होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176369540034252800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176366887464140800?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176365120198336512?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
