Share

विदर्भातील शेतकऱ्यांना जगवा, ‘या’ भाजप आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: 

कारंजा : महिन्यापासून कारंजा व मानोरा तालुक्यात झालेला संततधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे उडीद व मूग पिकांना मोठा फटका बसला आहे. तोडणीस आलेल्या शेंगाना झाडावरच कोंब फुटले असून, सखल भागातील सोयाबीन, कापूस व तूरीचे पीक पूर्णपणे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अपेक्षीत उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट झालेली आहे. सरसकट पंचनामे करून ज्या पिकांच्या नुकसानीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट येत असेल अशा पिकांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सततच्या दृष्काळी परिस्थितीत दुबार पेरणी, कोरोनाचे संकट अशा दुहेरी संकटाचा सामना करीत कशी-बशी वाचविलेली पिके रोगाचा प्रादुर्भाव व खताच्या साठेबाजीला बळी पडत आहेत. त्यामुळे अपेक्षीत उत्पन्नात निश्‍चितच ५0 टक्क्यांपेक्षा अधिक घट येण्याची शक्यता आहे. नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकर्‍यांचे वैयक्तिक पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी तसेच शासनाच्या पिकविमा आदेशानुसार पिकाच्या अपेक्षीत उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिकची घट येत असेल तर पिकविमा नुकसानीच्या नियमानुसार शेतकर्‍यांना विमा मंजुरीच्या प्रमाणात २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाई देण्याचे शासनाचे निर्देश आहेत.

कंगना राणावतचे रक्षण करण्यास रिपब्लिकन पक्ष पुढे येईल – रामदास आठवले

त्यामुळे शेतकर्‍यांची सत्वपरीक्षा न पाहता पिकाच्या नुकसानीचे नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पंचनामे तसेच विम्याची आगाऊ २५ टक्के रक्कम मंजूर करावी अशी आग्रहाची विनंती आमदार राजेंद्र पाटणी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

बाजारांत तोबा गर्दी…सोशल डिस्टंसिंगचे नियम पायदळी… टाळेबंदी लागणार का ? वाचा काय आहे प्रकार…

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!