Share

फक्त नावानेच नाही तर मनानेही ‘महाराज’; सौरव गांगुलीने गरीब गरजूंसाठी दिली ५० लाखांची मदत

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लाखो लोकांना या व्हायरसचा फटका बसला आहे. देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर झाल्याने समाजातील हातावर पोट असणाऱ्या वर्गाची अडचण झाली आहे. अश्या घटकाला मदत करण्यासाठी आता उद्योगपती, उदयोजक पुढे येऊन सरकारला आर्थिक मदत करत आहेत.

आता पश्चिम बंगाल मधील गरीब आणि गरजूंना मदत करण्याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने घेतला आहे. २१  दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या अन्नचा प्रश्न काही अंशी सुटावा यासाठी गांगुली पुढे आला आहे. त्यासाठी गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन दिलं आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात जाहीर करण्यात आल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या साथीने ५० लाखांच्या तांदळाची मदत गांगुलीकडून करण्यात येणार आहे. याबात लाल बाबा कंपनीनेही पत्रक जारी केली आहे. या पत्रकात गांगुलीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही करण्यात आलं आहे.

त्यामुळे मैदानातील हिरो असलेला चाहत्यांचा दादा आणि द महाराज नावने ओळखला जाणारा सौरव गांगुली  हा मनानेही महाराज असल्याच  असल्याचं बघायला मिळालं आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!