कोल्हापूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात तीन मंत्री असूनही कोल्हापूर जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने मंत्र्यांविषयी जिल्ह्यातील नागरिकांच्या मध्ये नाराजी दिसत आहे. विशेष म्हणजे राजेंद्र पाटील-यड्रावकर स्वतः “आरोग्यराज्यमंत्री” असूनही कोल्हापूर जिल्हा कोरोनाच्या विळख्यात अजून कसा? असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यावर राज्यात बरेचसे जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले. पण कोल्हापूरच्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाही गोकुळ ची निवडणूक घेण्यावर भर दिला. इतकंच नाही तर मतदाना दिवशी शेकडोंच्या संख्येने एकत्र मतदार सोबत घेऊन शक्तिप्रदर्शनही केलं. कोरोना नियमांची पायमल्ली केली. त्यांच्यासोबतच मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्य बडे देखील यात मागे नव्हते.
यानंतर, निवडणूक निकाल लागेपर्यंत म्हणजेच ४ मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं नव्हतं. निकाल लागताच सायंकाळी कडक लॉकडाऊनचे आदेश काढण्यात आले पण सोशल मिडीयामध्ये नागरिकांनी रोष व्यक्त केला. निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःचा स्वार्थ साधल्यानंतर जिल्ह्यातील मंत्री आता जागे झालेत का? अश्या प्रकारच्या बोचऱ्या टीका-टीपणी करण्यात आल्या.याचाच परिणाम म्हणजे दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन चे नियम शिथिल करण्यात आले.
पण राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. जिल्ह्यात आजही दिवसाला जवळपास दीड हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. तर किमान तीस जणांचा मृत्यू होतोय. कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट आजही 15 टक्क्यांहून अधिक आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील तीन टक्क्यांपर्यंत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची अपुरी यंत्रणा, टेस्टिंगचे वाढलेले प्रमाण, त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात उपचारासाठी येणारे रुग्ण, अशी काही कारण जिल्ह्यातील रुग्ण वाढीसाठी दिसत आहेत.
पण यावरून हे स्पष्ट होतंय की पालकमंत्री सतेज पाटील जिल्ह्याचं योग्य व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत. आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्या कामाचा व संपर्काचा अभाव दिसत आहे. कोविड सेंटरची कमतरता व दुसरीकडे खासगी हॉस्पिटलमध्ये भरावे लागणारे भरमसाठ पैसे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता “सतेज पाटील तुम्हाला जमत नसेल तर बाहेरील जिल्ह्यांची मदत घ्या पण कोल्हापूरला कोरोनामुक्त करा” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांच्या मधून उमटू लागल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘आधी दिल्लीची परवानगी घ्या मगच आघाडीचे बोला’, ‘वंचित’चा पटोलेंना टोला
- राज ठाकरे यांचा आज ५३वा वाढदिवस ; ‘या’ ठिकाणी मिळतंय ५३ रुपयांत एक लिटर पेट्रोल
- ‘वडेट्टीवार काम चलावू मंत्री, त्यांना कॅबिनेटमध्येही महत्व नाही’; निलेश राणेंची टीका
- ‘पहिले स्वबळावर आमदार निवडून आणा मग मुख्यमंत्रीपदाचं बोला’, सत्तारांचा पटोलेंना टोला
- ‘शिवसेनेने इटॅलियन विचारधारा स्विकारली यामुळे राम मंदिराला बदमान करण्याची भूमिका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

