Share

‘शिवसेनेने इटॅलियन विचारधारा स्विकारली यामुळे राम मंदिराला बदमान करण्याची भूमिका’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अयोध्येतल्या वादग्रस्त आणि बहुचर्चित राम मंदिरासाठीच्या भूखंडाच्या खरेदीत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी रविवारी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टवर भ्रष्टाराचाराचे गंभीर आरोप केले आहेत. तसेच या भ्रष्टाचाराची सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणीही केली.

राम मंदिर ट्रस्टने अवघ्या दहा मिनिटांत 2 कोटींचा भूखंड 18 कोटीला खरेदी केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या आरोपामुळे आधीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले राम मंदिर पुन्हा एकदा प्रश्नांच्या वादळात अडल्याचे दिसत आहे. संजय सिंह यांनी काही कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केला आहे. संजय सिंह यांच्या या आरोपांनंतर आता देशातील राजकारण तापू लागले आहे.

महाराष्ट्रासह देशभरातील राजकीय नेते आता भाजप व RSS वर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आज शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी जगभरातून निधी आला. हा निधी लोकांनी श्रद्धेपोटी दिली आहे. अनेक ठिकाणाहून देणग्या गोळा केल्या गेल्या. राम मंदिर हा श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे घोटाळ्याचा विषय नाही. त्यामुळे जर निधीचा गैरवापर होत असेल तर ट्रस्टच्या प्रमुखांनी खुलासा करावा अशी मागणी यावेळी संजय राऊत यांनी केली आहे. ट्रस्टने समोर येऊन आरोपांचा खुलासा करावा इतकंच नाहीतर यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत आणि भाजपच्या नेत्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे, असंही यावेळी राऊत म्हणाले होते.

शिवसेनेने घेतलेल्या या भूमिकेला आता भाजपकडून त्यांना चांगलेच पर्तिऊतर दिलेले आहे. महाराष्ट्र भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी यावरून शिवसेनेला चांगलेच सुनावले आहे. तुषार भोसले म्हणाले की, ‘शिवसेनेने इटालियन विचारधारा स्विकारली आहे. यामुळे ते राम मंदिराला बदमान करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कोणतीच अधिकृत माहिती न घेता हे विधान केलं आहे. हे पूर्णपणे खोटं आहे.

राम मंदिर ट्रस्टने पूर्णपणे पारदर्शकपणे आणि बाजारात असलेल्या किंमतीनुसारच हा सौदा केला आहे. यामुळे मी शिवसेना आणि संजय राऊत यांना आव्हान करतो की, त्यांनी दिलेले एक कोटी रुपयांचे दान वापस घ्यावे पण आमच्या राम मंदिराचे बदनामी करू नये.’अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी मांडली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!