मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी इन्कम टॅक्स विभागाची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. दौंड शुगर ,आंबलिक शुगर , जरंडेश्वर साखर ,पुष्पदंतेश्वर शुगर,नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या दोन बहिणींच्या घरावर सुद्धा धाडी टाकल्या आहेत.
दरम्यान, आज सकाळपासून आयकर विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात येत आहे. काही कारखान्यांवर आयकर विभागाची टीम पोहोचली आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याची माहिती आहे. राज्य सरकारच्या पोलिस यंत्रणेला कुठलीही कल्पना न देता सीआरपीएफच्या जवानांची मदत घेऊन ही कारवाई सुरू आहे.
जरंडेश्वर कारखान्यात एक टीम दाखल झाली असल्याची माहिती आहे. तर अंबालिका साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जंगल वाघ यांच्या काटावाडीतील घरी तपास यंत्रणा पोहोचल्या आहेत. जंगल वाघ हे काटावाडीतील अजित पवारांच्या घराजवळच राहतात. अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका कारखाना अजित पवारांच्या खाजगी मालकीचा आहे. त्याचबरोबर बारामतीतील डायनॅमिक्स डेअरीवर देखील छापा सुरु आहे. शरद पवारांशी संबंधित गोयंका कुटुंबीयाची आहे. या सर्व पवारांशी संबंधित संस्था असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाष्य करत भाजपवर शरसंधान केले आहे. गेल्या सात वर्षात खुनशी राजकारण सुरु झालं असून आगामी काळात सरपंचालाही ईडीचा नोटीस येईल असं ठाकूर यांनी म्हटलं आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या, हे सगळं फार धक्कादायक असून राजकारणी लोकांना कुटुंब नसतं का? देशाच्या संस्कृतीला अशोभनीय असं खुनशी राजकारण गेल्या 7 वर्षात सुरु आहे. उद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला ईडीची नोटीस आली तर आश्चर्य वाटायला नको. इतक्या खालच्या पातळीवर जाउन ईडी, आयकर अशा यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे. याचा निषेध आहे असं ठाकूर म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांना आता साखर कडू वाटायला लागलीय का?; किरीट सोमय्यांचा तिखट सवाल
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- अभिनेता रणबीरच्या ‘या’ चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये वाढलीय उत्सुकता
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू


