टीम महाराष्ट्र देशा – राज्यात आता सरपंचांची निवड लोकांमधून थेट निवडणुकीऐवजी, निवडून आलेल्या सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
या दृष्टीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामधील कलम ७, कलम १३, कलम १५ , कलम ३५, कलम ३८, कलम ४३, कलम ६२, कलम ६२अ मध्ये सुधारणा व कलम ३० अ-१ ब व कलम १४५-१ अ चा नव्याने समावेश करण्यासाठी मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
तसेच खर्चाच्या विवरणाच्या संदर्भात सुधारित वेळापत्रकात बदल करण्यास मंजुरी देण्यात आली. संबंधित कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्यात येईल. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून देण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत आज पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात आले.#मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/9djM4DO1vx
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 29, 2020
हेही बघा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

