औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील जामडी घाटग्राम पंचायतचे सरपंच, ग्रामसेवक आणि दोन ग्रामपंचायत सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे चौघेही गुरुवारी झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सहभागी होते. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेया सदस्य आणि गावकऱ्यांच्या चिंतेत मात्र भर पडली आहे.
जामडी घाटग्राम पंचायतीत उपसरपंच पदाची निवडणुक गुरुवारी झाली. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुक प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ग्रामसेवक, सरपंच व सदस्यांनी मंगळवारी ( दि. २ ) वडनेर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी केली. मात्र याचा अहवाल त्यांना लागलीच मिळाला नाही.
यामुळे सर्वजण गुरुवारी झालेल्या निवडणुकीत सहभागी झाले. सभेस लोकनियुक्त सरपंच, पाच सदस्य, ग्रामसेवक, तलाठी आदींची उपस्थिती होती. दरम्यान , सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी रात्री कोरोना चाचणीचा अहवाल प्राप्त झाला. यात निवडणूक प्रक्रियेत सहभागी ग्रामसेवक, सरपंच व दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह निघाले. यामुळे गावात खळबळ उडाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- जिल्हाधिकारी कार्यालयाची स्वच्छता; प्रशासनाची कधी?
- ‘ग्रामपंचायत क्षेत्रातील बांधकामास परवानगीची जबाबदारी देवू नका’
- विनयभंग प्रकरण; फरार हनुमान महाराजांचा जामीन फेटाळला
- मनसुख हिरेन हे तर पट्टीचे स्वीमर,मग ते तलावात जीवन कसे संपवू शकतात?
- धीरज देशमुखजी, मतदारसंघातील प्रश्न सोडवलात, राज्यातील इतर ग्रामपंचायतींचे काय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
