औरंगाबाद : तीन वर्षांपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने मराठा मुला-मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र ही घोषणा केवळ कागदावरच राहिली. अजूनही हे वसतिगृह सुरू करण्यात आलेले नाही. आता शहरातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे कार्यालय व वस्तीगृह सारथीसाठी देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजासोबत झालेल्या चर्चेत सारथीसाठी कार्यालय व वसतीगृह देण्याच्या शब्द दिला होता.
मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीगृह धर्तीवर औरंगाबाद येथील मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याची मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन भाजप सरकारने याबाबत घोषणा केली होती. मात्र अद्याप याची अंमलबजावणी झालेली नाही. औरंगाबाद हे शहर मराठवाड्याची राजधानी आहे. संपूर्ण मराठवाड्यातून खेड्यापाड्यातून गरीब मुले मुली शिक्षणासाठी शहरात दाखल होतात. मात्र घरची परिस्थिती गरीबीची असल्याने अनेकदा विद्यार्थ्यांचे राहायचे खायचे-प्यायचे हाल होतात.
खाजगी वस्तीगृहात राहणे त्यांना परवडत नाही. हीच बाब लक्षात घेऊन मराठा समाजाच्या वतीने मराठा विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक वस्तीगृह करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्यानुसार आता शहरातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सध्या बंद असलेले कार्यालय व वसतीगृह सारथीला देण्यात येणार असल्याचे उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. या विषयी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री व खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींसोबत चर्चा झाली होती. दरम्यान यानिमित्ताने सारथीच्या कामाला गती मिळेल, असा विश्वास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ईडीचा धडाका सुरूच; आता ‘या’ काँग्रेस नेत्याला बजावला समन्स
- राज्यातील सरकार स्थिर, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत; जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
- ‘मेकिंग दि तालिबान ग्रेट अगेन’; अमेरिकेत बायडेन यांचे होर्डिंग्स
- पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले ‘हे’ सूचक वक्तव्य महत्वाचे-जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

