मुंबई : बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत असतो. तसेच अक्षय हा त्याच्या चित्रपटाच्या शुटींग वेगात संपवण्यासाठीही ओळखला जातो. नुकतेच त्याने आनंद एल. राय यांच्या अतरंगी रे या चित्रपटाचे चित्रीकरण संपवले. याबाबत त्याने सोशल मीडीयावर पोस्ट करुन आपल्या चाहत्यांना माहिती दिली. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत साराअली खान आणि धनुष आहे.
या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर चित्रपटातील अभिनेत्री सारा अली खाननेही एक पोस्ट सोशल मीडीयावर शेअर करत अक्षय कुमारला धन्यवाद म्हणाली आणि माफी मागीतली. या पोस्टमध्ये साराने सुरुवातीला लिहीलं आहे की, धनुष तुझे खुप धन्यवाद या प्रवासात तुझ्यापेक्षा चांगला साथीदार कोणी असुच शकत नाही. नेहमी मदत करण्याची प्रेरणा देण्यासाठी धन्यवाद.
https://www.instagram.com/p/CM7BKL1JH-E/
या पोस्टमध्ये सारा लिहीते की, प्रेम, पाठिंबा, भारत दर्शन, चविष्ट खाद्यपगार्थ, सुर्योदय आणि सुफी संध्याकाळ हे नेहमीच आठवणीत राहील. या पोस्टमध्ये शेवटी अक्षय कुमारला सेटवरील एनर्जी, सकारात्मक आणि खेळीमेळीचे वातावरन ठेवण्यासाठी अक्षय कुमारची आभारी आहे मात्र चित्रीकरणादरम्यान आपल्या वेगवेगळ्या पोशाखात काढलेल्या फोटोसाठी तुम्हाला जो त्रास दिला त्यासाठी सॉरी असे साराने या पोस्टमध्ये म्हणले आहे.
महत्वाच्या बातम्या
- पत्नीच्या अनैतिक संबंधांला कंटाळून पतीने घेतला गळफास
- तिसऱ्या वन डे सामन्यातून कुलदीप यादव जाऊ शकतो बाहेर ; अशी असू शकते प्लेइंग XI
- ‘नियमांचे उल्लंघन केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, हॉटेल हे कोरोनाची साथ असे पर्यंत कायमचे बंद’
- धोनीच्या अनुपस्थितीमुळे कुलदीप-चहलची जोडी फ्लॉप
- ‘वाईट गोष्टी म्हणजे अकर्मण्यता, खंडणी, टक्केवारी, सूडबुद्धी वगैरे का’?, भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल


