ठाणे : मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा खारीगाव-पारसिक नगर येथील नवरात्रौत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. यंदा कोरोनामुळे सर्वच सण साजरे करण्यावर मर्यादा येत असल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसांमध्ये सर्वांना नवरात्रीचे वेध लागतील. आपण मतदारसंघात गेली 10 वर्षे नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करीत असतो. दांडीया-गरबाही खेळला जातो. मात्र, यंदा तेथील नागरिकांनीच गरब्याचे आयोजन करु नका, अशी विनंती केली आहे. तसेच, देवीची प्रतिष्ठापणाही कोणाच्या तरी घरी करण्यात यावी, असेही नागरिकांनी सुचविले आहे. या सुजाण नागरिकांच्या विनंतीचा मान ठेऊन यावेळी सार्वजनिक नवरात्रोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/988870031582200/
महत्वाच्या बातम्या :
- मराठा समाज करणार ‘थोबाड फोडो आंदोलन’! कोणत्या नेत्यापासून होणार सुरुवात?
- फुल नहीं चिंगारी है! फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंह होणार राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक
- मराठा महासंघाच्यावतीने जिल्ह्यातील मंत्र्यांच्या निवासस्थानासमोर होणारे आंदोलन स्थगित
- अहमदनगरमध्ये कोरोनाचा हाहाकार; काल दिवसभरात १२ मृत्यूसह ९२३ कोरोना बाधित रुग्णांची वाढ
- राहुरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे कोणाला संधी देणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

