Share

संजय राऊतांनी शब्द आणि देहबोली जपून वापरावी : चंद्रकांत पाटील

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : भाजप – शिवसेनेतील सत्ता संघर्ष चांगलाच पेटला आहे. या सत्ता संघर्षात शिवसेनेकडून खा. संजय राऊत चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना शब्द आणि देहबोली जपून वापरण्याचा सल्ला दिला आहे. राज्यात महायुतीची सत्ता ५०० % येणार असून लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बैठक घेणार आहेत, असेही पाटील म्हणाले.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. या संदर्भातचं आढावा घेण्यासाठी चंद्रकांत पाटील आज सासवड येथे आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, प्रत्येकाला भूमिका मांडण्याची अधिकार असतो. मात्र भूमिका मांडताना शब्द जपून वापरावे लागतात. त्यामुळेचं मी संजय राऊत यांना शब्द आणि देहबोली जपून वापरण्याचा सल्ला देत आहे. राऊत यांना सल्ला देण्या इतपत मी मोठा नाही. मात्र युतीला, राज्याला घोटाळा होईल असे बोलू नये. तेच बोलायचं मात्र जपून बोलावं हे मी माझ्या राजकीय जीवनात शिकलो. त्यामुळे त्यांनीही तेच बोलव पण ते जपून बोलावं, असे पाटील म्हणाले.

निवडणुकीच्या निकालानंतर सत्तेच्या वाटपा वरून संजय राऊत चांगलेचं आक्रमक झाल्याचे दिसत आहे. युती होताना जे ठरले होते त्याप्रमाणे भाजप वागत नसल्याचा आरोप संजय राऊत करत आहेत. ‘सामना’ मधूनही संजय राऊत भाजपला टोले लगावत आहेत. तर माध्यमांशी बोलतनाही राऊत भाजपवर टीकेची झोड उठवत आहेत. यावरून राऊत यांनी शब्द आणि देहबोली जपून वापरावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1191320600536436737?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191320309925736448?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191315605128802304?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!