Share

Sanjay Raut : ईडीच्या नोटीसीनंतर संजय राऊतांचा थेट देवेंद्र फडणवीसांना इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेला धक्कावर धक्के बसत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आहे. २१ जून रोजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर यांची ईडी चौकशी सुरु होती. पुढे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली. यानंतर आता थेट शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली आहे. जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उद्या अर्थातच २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे.

संजय राऊत यांना पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. या नोटीसीनंतर लगेच संजय राऊत यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. “मला नुकतेच कळले की ईडीने मला समन्स बजावले आहे. चांगले! महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचे हे षडयंत्र आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. मला अटक करा! जय हिंद!”, असे ट्वीट करत थेट इशारा राऊतांनी अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. तसेच त्यांनी फडणवीसांना टॅग देखील केले आहे.

दरम्यान, याआधी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाकडून मोठी कारवाई केलीये. जालना जिल्हातील जालना सहकारी साखर कारखान्यावर ही कारवाई करण्यात आलीय. खोतकर यांच्याशी संबंधित तब्बल 78 कोटी 38 लाखाची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. खोतकर यांची मालमत्ता असलेली जालना सहकारी साखर कारखान्याची जमीन, एक रेसिडेन्शिलय प्लॅन्ट आणि एक बिल्डिंग आणि स्ट्रक्चर जप्त करण्यात आलं. याबाबतची माहिती ईडीने आपल्या ऑफिशिलय ट्विटर अकाऊंटवरुन दिली होती.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!