मुंबई : ‘काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या सरकारला पुढील पाच वर्षात अजिबात धोका नाही. महाविकास आघाडी सरकार पुढील निवडणूकही एकत्र लढेल,’ असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात कोरोनाचं संकट आहे, महाराष्ट्रात सरकार बनवण्यात पवारांचं योगदान आहे. कोरोनाचा काळ वेदनेचा आहे, लोक घरी आहेत, विरोधकांना काही सुचतंय, पण एक लक्षात ठेवा महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे पाच वर्ष कार्यकाळ पूर्ण करेल,’ असं राऊत म्हणाले.
‘करोनावर लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचा आहे. संशोधन जारी है. विरोधकांनी तात्काळ quarantine व्हावे हेच बरे.. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील. Boomerang…जय महाराष्ट्र…! असं ट्विट करत राऊत यांनी टीका केली आहे.
दरम्यान, “शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल संध्याकाळी ‘मातोश्री’वर भेट झाली. दोन नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कुणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील, तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी. जय महाराष्ट्र !!” असं ट्वीट संजय राऊत यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
#covid_19 : आतापर्यंत राज्यात 15 हजार 786 जणांनी केली ‘कोरोना’वर मात
केंद्राच्या पॅकेजला ‘आत्मनिर्भर’ हे केवळ गोंडस नाव, यातून दिलासा मिळणे अशक्य : चव्हाण
‘रिकाम्या खोक्यात भाजपची रिकामी डोकी भरून गुजरातच्या अंधार कोठड्या पाहायला पाठवायला हवे’
…तर आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जावे लागेल : WHOने दिला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

