🕒 1 min read
मुंबई : शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीची स्थापना करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी भाजपचे नेते सोडत नाहीत. त्यातच संजय राऊत हे महाविकास आघाडीच्या बाजूनं सातत्यानं किल्ला लढवत असल्यानं ते नेहमीच रडारवर असतात. आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचं कौतुक केल्यानं भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राऊतांवर टीका केली आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये आज लिहिलेल्या लेखात प्रियंका गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं आहे. लखीमपूर खेरी इथं मंत्रीपुत्रानं शेतकऱ्यांना चिरडल्याच्या घटनेनंतर प्रियंका आक्रमक झाल्या होत्या. पीडित कुटुंबियांची भेट घेण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांना अटक करण्यात आली. मात्र, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. त्यांच्या या संघर्षाचं संजय राऊत यांनी आपल्या लेखात कौतुक केलं आहे. प्रियंका यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे.
पडळकर यांनी याच लेखावरुन सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. पडळकरांनी आपल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांचा उल्लेख पडळकर यांनी ‘जनाब’ असा केला आहे. ‘जनाब संजय राऊत यांनी सामनाचे रूपांतर ‘बाबरनामा’त केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय,’ असं पडळकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
जनाब #संजय राऊत यांनी #सामनाचे रूपांतर बाबरनामात केल्यानंतर आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब #ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे विलीनीकरण #कॉंग्रेसमध्ये करण्याचा जणू काही विडाच उचललेला दिसतोय.#BJPMaharashtra pic.twitter.com/i9jQI46gRy
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) October 10, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

