🕒 1 min read
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला अद्याप सव्वा वर्षाचा अवधी आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे नियोजन भाजपाने सुरू केल्याचे वृत्त आल्यापासून या निवडणुकीचा विषय राजकीय वर्तुळात ऐरणीवर आला आहे.
मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.
यानंतर, शिवसेनेनं देखील चोख उत्तर देत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असं ठणकावलं होतं. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने एकत्र लढत भाजपला रोखलं आहे. पुणे-नागपूर सारख्या भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या जागा देखील भाजपला गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे आता येत्या निवडणुकांमध्येही भाजपला धूळ चारण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्थानिक नेत्यांच्या मर्जीसाठी वेग-वेगळं लढणार याबाबत आघाडीतील नेतेच वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत.
आज, शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांना यशस्वी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेनंतर लीलावती रुग्णालयातून सोडलं असून त्यांनी देखील महाविकास आघाडीच्या विजयावर भाष्य करतानाच पुढील निवडणुकांबाबत सूचक विधान केलं आहे. ‘मुंबई महापालिका किंवा इतर निवडणुकीत आम्ही एकत्र राहू. कारण एकत्र राहण्याचे फायदे हे कालच्या निवडणुकीत दिसले.’ असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
तर, ‘भाजपकडे मास्टर स्ट्रॅटजी आहे. त्यांच्याकडे याबाबत मोठी फौज आहे. आम्ही साधे लोक, बसून चर्चा करतो, बैठका घेतो. कार्यकर्ते काम करतात. त्यांच्याकडे जागतिक यंत्रणा आहे. जागतिक स्तरावरुन त्यांना मदत मिळते,’ असा टोला देखील त्यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आता डिसले गुरुजीं आमदार होणार? दरेकर करणार शिफारस
- कृषी कायद्यांविरोधात काही लोक राजकीय हेतूनं गैरसमज पसरवत आहेत : खोत
- ‘पटोले, वडेट्टीवार, भुजबळ, मुंडे, शेंडगे हेच लोक मराठा आरक्षणाचे कट्टर विरोधक’!
- कृषी कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांचा खटला विनामूल्य लढणार – ज्येष्ठ विधिज्ञ दवे
- ‘काळे फासण्याच्या धमक्यांना भीत नाही,म्हणूनच तारीख आणि वेळ जाहीर करुन मी शिर्डीत येतेय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
