Share

संजय राऊत म्हणतात, आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा अधिकच वाढत चालला आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत सत्ता स्थापनेच्या आणीबाणीच्या काळात आक्रमकपणे शिवसेनेची बाजू मांडत आहेत. आजही त्यानू पत्रकार परिषद घेत राज्यात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे ठणकावून सांगितले. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलाल पाहिजे, असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

संजय राऊत आणि रामदास कदम यांनी काल राज्याचे राजपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीबाबत त्यांनी खुलासा केला. ते म्हणाले, ” काल राज्यपालांसोबत राज्यातील परिस्थितीबाबत बोललो आहोत. आमची भूमिका मांडली. रोज बोलणं आता योग्य नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरा बदलला पाहिजे. सरकार लवकर स्थापन होईल. मुख्यमंत्री सेनेचा होईल. ” सर्व पक्षाचे नेते प्रयत्न करत आहेत. सर्वांची भूमिका आता महत्वाची आहे. महाराष्ट्राचा निर्णय हा महाराष्ट्रात होईल. महाराष्ट्रामध्ये स्थिर सरकार यावं हे पवारांना आणि काँग्रेसच्या नेत्यांना वाटतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुद्धा स्थिर सरकार हवं आहे. दिल्लीत काय झालं मला माहित नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं

दरम्यान, त्यांनी शरद पवारांसोबत आता काही बोलणं झालं नसलं तरी बोललो तर अपराध आहे का, याशिवाय जे कोणी पवारसाहेबांसोबत बोलत आहेत हे आम्हालाही माहीत आहे. फक्त आम्ही बोललो की दिसतं, असंही संजय राऊत यांनी नमूद केलं. त्यानंतर शपथ ग्रहण होईल आणि राज्यावर जे ग्रहण लागलं आहे ते सुटेल, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1191594647732121601?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191597725986373632?s=20

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!