मुंबई : सतत राजकीय मैदानात ‘रोखठोक’ भूमिका घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे लेकीच्या लग्नावेळी हळवे झाल्याचे चित्र बघायला मिळाले. पूर्वशी राऊत (Purvashi Raut) यांच्या विवाहाच्या निमित्ताने आयोजित संगीत सोहळ्यात हरहुन्नरी शास्त्रीय गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांनी सूर लावला आणि वडील संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यासह पूर्वशीचे दोन्ही काकाही भावूक झाले.
अष्टविनायक चित्रपटातील कै. वसंतराव देशपांडे यांच्या आवाजातील ‘दाटून कंठ येतो, ओठांत येई गाणे, जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने’ हे गीत ऐकून अनेकांना अश्रू अनावर होतात. वसंतरावांचे नातू, राहुल यांनीही राऊतांच्या मुलीच्या संगीत सोहळ्यात हे गीत सादर केले आणि उपस्थितांना अश्रू अनावर झाले.
https://www.instagram.com/p/CWzWuJQjEwL/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, पूर्वशी राऊत ही उद्या (२९ नोव्हें.) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. मल्हार हे आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. लग्नापूर्वी आयोजित संगीत कार्यक्रमात राहुल देशपांडे यांनी गाणी सादर केली. यावेळी संजय राऊत, सुनिल राऊत आणि संदीप राऊत हे तिघेही भाऊ काहीसे भावूक झाले होते. रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबही उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या:
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल


