टीम महाराष्ट्र देशा : भाजप आणि शिवसेनेमध्ये जागावाटपामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजप जास्त जागांसाठी आग्रही आहे. तर शिवसेना ५०-५० च्या प्रस्तावावर अडून बसल्याचं चित्र आहे. दोनही पक्षातील नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. तरीही आतापर्यंत काही तोडगा निघालेला नाही.
युतीच्या या जागावाटपाच्या गोंधळावरून संजय राउत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी विधानसभेच्या जागावाटपाबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी एक फॉर्म्युला ठरवला होता. समसमान जागावाटपाचे सूत्र तेव्हा ठरले होते. त्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. आता भाजपाला जर आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे असं राउत यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे बोलताना राउत यांनी हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे दिलेल्या शब्दाला किंमत आहे. युतीमध्ये आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा काळ पाहिलाय. प्रमोद महाजन यांनाही पाहिलंय. हे तिन्ही नेते शब्दाला पक्के होते असंही राउत यांनी म्हणत सध्याच्या भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, संजय राउत यांनी ‘महाराष्ट्रात 288 जागांचे वितरण भारत आणि पाकिस्तानच्या विभाजनापेक्षा अधिक भयंकर आहे. आपण सरकारऐवजी विरोधी पक्षात असतो, तर आजचे चित्र वेगळे असते. आम्ही जागांबाबत जे काही ठरवू ते तुम्हाला नक्कीच सांगू असंही विधान केले होते.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1176414534333952001?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176410534016512000?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1176408283583696896?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

