मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र येत्या २ दिवसांत तापमानात किंचित वाढ अपेक्षित असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. नंतर 25 ते 27 जानेवारी दरम्यान पुन्हा उत्तर महाराष्ट्र पट्टयामध्ये तापमान खाली जाण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
कोरड्या हवामानामुळे राज्यात अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडल्याचं पाहायला मिळालं. यामुळे किमान तापमानातही घट झाली आहे. अशात उत्तर भारतात अनेक राज्यांमध्ये वातावरणात वेगाने बदल होताना दिसत आहे. देशात अनेक राज्यांमध्ये तर अद्यापही पाऊस सुरू आहे. राज्यातही फेब्रुवारी महिन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. यामुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अचानक कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना वेडयात काढले?
- महाजन, विखेंपाठोपाठ फडणवीसही रिकाम्या हाताने परतले; अण्णा उपोषणावर ठाम
- ‘बाळासाहेब ठाकरे हे नाव जरी मनात आलं तर समोर येतं सामर्थ्यवान, दमदार, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व’
- काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती दखल घेतली जाते,सातत्याने काम करत रहा- सव्वालाखे
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक: कर्डिलेंनी शक्तिप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज

