Share

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी लगावले ‘लंबोर्गिनी’ गाण्यावर ठुमके; व्हिडीओ व्हायरल

Published On: 

मुंबई : नेहमीच राजकीय मैदानात ‘रोखठोक’ भूमिका घेणारे शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे सध्या लेकीच्या लग्नाच्या धावपळीत व्यस्थ आहेत. संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊतचे उद्या(२९ नोव्हें.)लग्न होणार आहे. दरम्यान मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आयोजित संगीत कार्यक्रमात राऊतांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसोबत(Supriya Sule) ठुमके लावले आहेत. तसेच दोघांच्या डांन्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी पूर्वशीचा विवाह होणार आहे. मल्हार हे आयटी इंजीनियर असून त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तर, पूर्वशी राऊत या उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ चित्रपटाच्या निर्मात्या आहेत.

दरम्यान, लग्नापूर्वी आयोजित संगीत कार्यक्रमात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या आग्रहास्तव संजय राऊत यांनी ठेका धरत डान्स केला. यावेळी त्यांच्या पत्नी वर्षा राऊतदेखील उपस्थित होत्या. सुप्रिया सुळेंनी आग्रह केल्यानंतर त्यांनीदेखील डान्स करत आनंद लुटला.रेनेसाँ या सप्ततारांकित हॉटेलमध्ये हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!