Share

संजय राऊत यांना पक्षाकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकारचं नाही – भाजप

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – राज्यातील विधानसभा निवडणूक जरी पार पडली असली तरी सत्ता कोण स्थापन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सत्तास्थापनेविषयी भाष्य करताना शिवसेनेने जर ठरवलं तर बहुमत सिद्ध करू शकते असं विधान केले आहे.

संजय राऊत यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी भाष्य केलं आहे. लाड यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना पक्षाकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकारच नाही, ते शिवसेनेचे नेते असले, तरी त्यांना याबद्दल अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाही, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एक परिपक्व राजकारणी आहेत. ते ठाकरे आहेत. सरकार आमचंच बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना लाड यांनी ‘प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या नेत्याला आवडेल असं बोलत असतो. मात्र ‘मातोश्री’ची भूमिका स्पष्ट आहे’ तसेच कोण कोणाला भेटतंय याचा राजकीय अर्थ काढू नये असं म्हणत संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीवर भाष्य केले आहे.

दरम्यान, प्रसाद लाड यांनी येत्या तीन-चार दिवसात महायुतीचं सरकार बनेल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र शिवसेनेला कोणती पदे मिळतील यावर मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190195828024958977?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190194597177090048?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190194571679940611?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!