मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. त्यात 43 नव्या मंत्र्यांचा समावेश केला. हा समावेश करताना जुन्या 12 मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांसह मोदी पुन्हा एकदा कामाला लागले आहेत. या बदलाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.या मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी केंद्राने सहकार मंत्रालय स्थापन केले असून या मंत्रालयाचा कारभार आता गृहमंत्री अमित शाह सांभाळणार आहेत.
सहकाराच्या जोडीने राजकारण विकसित झाल्यानंतर सहकार चळवळ राजकारणाचा अड्डा होण्यास प्रारंभ झाला. त्यातून मग सहकार चळवळीची हळूहळू वाताहत होण्यास सुरुवात झाली. सहकारी संस्थांचा वापर राजकीय फायद्यासाठी करण्याचा एक पॅटर्न विकसित होऊ लागला. हे दोष दूर करण्यासाठी आणि देशातील सहकार चळवळीला बळकट करण्यासाठी तसेच त्याची पाळेमुळे अधिक खोलवर रुजवण्यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी नव्या सहकार खात्याच्या स्थापनेवर भाष्य केले आहे. केंद्रात सहकार खाते तयार झाले आहे. ते केवळ महाराष्ट्र्राला त्रास देण्यासाठी तयार केले असेल तर हा आणखी एक सत्तेचा गैरवापर आहे असं त्यांनी म्हटले आहे. जर सहकार मजबूत करण्यासाठी हे नवीन खाते असेल, तर त्याचे आम्ही स्वागत करतो. सहकार हा राज्यघटनेनुसार राज्यांचा विषय आहे. मात्र राज्यातील सहकार संपवण्यासाठी केंद्रातील सहकार खाते काम करणार असेल, तर तो लोकशाहीला फार मोठा धोका आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या टीकेवर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.ज्या संजय राऊतांना स्वतः च्या शिवसेनेचा सहयोग नाही. ज्यांची फक्त माध्यमांबरोबर सहयोग हीच त्यांची ओळख अशा संजय राऊतांनी सहकार बद्दल बोलावं यापेक्षा विनोदाची गोष्टच होऊ शकत नाही. जेव्हापासून अमितभाई शाह हे केंद्रीय सहकार मंत्री झाले तेव्हापासून राऊत साहेब आपल्या नवीन मालकांसाठी फार चिंतित दिसत आहेत. राऊत साहेब चिंता चिते समान असते. कृपा करून काळजी घ्यावी असा टोला उत्तर भारतीय मोर्चा महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष संजय पाण्डेय यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कोविडचा फायदा घेत मुंबईतील 500 गृहनिर्माण सोसायट्या प्रशासकांकडून परस्पर बिल्डरच्या घशात?
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो


