Share

Sushma Andhare | “चार सहा महिन्यात शिंदे सरकार…”; सुषमा अंधारे यांचं भाकीत

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा कलगीतुरा राज्यात रंगला आहे. तर दुसरीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भाकीत वर्तवलंय.

शिंदे सरकार केवळ चार सहा महिनेच राहील, असं भाकीत त्यांनी केलं आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज आहेत. त्याबाबत सुषमा अंधारे यांना विचारण्यात आलं. त्यावर, त्यांच्यातील नाराज आमदार आमच्यात येतील. तसं चित्रं दिसत आहे, असं सुषमा अंधारे (Sushma Andhare) यावेळी बोलताना म्हणाल्या.

दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा शिंदे गटातील प्रवेश रखडला आहे. यावर अंधारे म्हणाल्या, तिकडं प्रवेश केला पाहिजे असं त्यांना वाटत असेल तर ठिक आहे. सत्तास्थानी प्रवेश करणं सोप्पं असतं. कारण तिकडे करीअर पटकन होतं, असा चिमटा सुषमा अंधारे यांनी काढलाय.

दरम्यान , कुरघोड्यांचं राजकारण आणि माणसांना ओलीस ठेवण्याचं राजकारण सातत्याने सुरू राहणार असेल तर हे सरकार जास्त काळ टिकेल असं वाटत नाही. माझ्या निरीक्षणानुसार फार फार चार सहा महिने हे सरकार चालू शकेल, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. यावर शिंदे गट आणि भाजपकडून काय उत्तर येतंय का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!