🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) गेल्या अनेक दिवसांपासून यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू आहे. आज या दोघांमध्ये घटस्फोट (Divorce) झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या नात्यांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्या पोस्ट नंतर सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची चर्चा सुरू झाली होती.
सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि शोएब मलिक (Shoaib Malik) बऱ्याच दिवसांपासून राहत आहे वेगळे
मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा आणि शोएब मलिक गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळे राहत आहे. या दोघांनी औपचारिक रित्या घटस्फोट घेतला असून आज यांच्या घटस्फोटात शिक्का मर्तब झाला आहे. पाकिस्तानातील व्यवस्थापन संघाचा सदस्य असलेल्या एका व्यक्तीने हा खुलासा केला आहे.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट नुसार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू शोएब मलिक याचं एक्स्ट्रा मेरीटियल अफेअर असल्याची चर्चा सुरू आहे. शोएब मलिक सध्या दुसऱ्या तरुणीला डेट करत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सानियाने शोएब बरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली होती. सानिया ने तिचा मुलगा इजहानच्या वाढदिवसाच्या दिवशी इंस्टाग्राम वर स्टोरी पोस्ट केली होती. त्या पोस्ट नंतर त्याच्या नात्यांमध्ये दुरावा असल्याचे स्पष्ट झालं होतं.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा 12 एप्रिल 2010 रोजी विवाह झाला होता. त्यानंतर सानिया आणि शोएबच्या लग्नानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध सुधारण्याची एक कडी निर्माण झाली होती. 2018 मध्ये सानियाला मुलगा झाला होता. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव इजहान ठेवले होते.
महत्वाच्या बातम्या
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल फ्लॉप, रोहित-विराटचा पलटवार, पॉवरप्लेमध्ये ३८ धावा
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल पुन्हा फ्लॉप, सेमीफायनलमध्ये 5 धावा करून बाद, भारताला पहिला धक्का
- T20 World Cup | मॅच आधीच टीम इंग्लंडला झटका, मार्क वूडच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज
- Sanjay Raut | “राज्य उपमुख्यमंत्री चालवतात, बाकीचे गुंडळतात”, फडणवीसांवर संजय राऊतांचा कौतुकाचा वर्षाव
- Sanjay Raut | भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा संजय राऊतांना दिल्लीहून फोन, राऊतांनी दिली माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
