🕒 1 min read
IND vs ENG T20 WC | T20 विश्वचषक 2022 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा रोमांचक सामना अॅडलेड ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यात जो संघ विजयी होईल तो 13 नोव्हेंबरला पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामना खेळेल. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ओपनिंगसाठी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मैदानात आले आहे. केएल राहुल 5 धावांवर बाद झाला. ख्रिस वोक्सच्या चेंडूवर केएल राहुलने त्याचा झेल जोस बटलरकडे सोपवला.
केएल राहुलच्या विकेटनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली जोरदार पलटवार करत आहेत. पॉवरप्लेमध्ये भारताची धावसंख्या एका विकेटच्या बदल्यात 38 झाली आहे. आज मोठ्या धमाक्याची भारताला गरज आहे. इंग्लंडसमोर मोठे आव्हान भारताला द्यावे लागेल. विराट-रोहितकडून भारताला मोठी अपेक्षा आहे.
अॅडलेडमध्ये आतापर्यंत एकूण 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. येथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने अधिक सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी विजयाची टक्केवारी कमी आहे. एकूण सात सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला चार सामन्यांत विजय मिळाला आहे.
At the end of the powerplay, #TeamIndia are 38/1
Live – https://t.co/ld3NCG5Kok #INDvENG #T20WorldCup pic.twitter.com/SpKlJk5mp0
— BCCI (@BCCI) November 10, 2022
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारताचा खेळ-11: केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
इंग्लंड प्लेइंग-11: जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, फिलिप सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG T20 WC | केएल राहुल पुन्हा फ्लॉप, सेमीफायनलमध्ये 5 धावा करून बाद, भारताला पहिला धक्का
- T20 World Cup | मॅच आधीच टीम इंग्लंडला झटका, मार्क वूडच्या जागी खेळणार ‘हा’ गोलंदाज
- Sanjay Raut | “राज्य उपमुख्यमंत्री चालवतात, बाकीचे गुंडळतात”, फडणवीसांवर संजय राऊतांचा कौतुकाचा वर्षाव
- Sanjay Raut | भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा संजय राऊतांना दिल्लीहून फोन, राऊतांनी दिली माहिती
- T20 World Cup | टीम इंडियाच्या विजयासाठी ‘या’ खेळाडूंना करावी लागणार अप्रतिम कामगिरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
