Share

नगरमधील राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात, संग्राम जगतापही पक्षांतराच्या तयारीत ?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. हे पक्षांतर खास करून भाजप- सेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादी कॉंग्रेसला बसत आहे. तर आता नगर जिल्ह्यातून आणखी एक वृत्त समोर येत आहे. नगर शहराचे आ. संग्राम जगताप देखील पक्षांतर करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. संग्राम जगताप हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत जाणार असल्याचं सांगितल जात आहे.

याआधी देखील संग्राम जगताप यांचे नाव चर्चेत होते. मात्र त्यावर त्यांनी पडदा टाकला होता. मी पक्ष बदलणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र लोकसभेतील निकाल पाहता आता कोणताच पर्याय त्यांच्या समोर नसल्याने. ते देखील आता पक्षांतर करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नगर मधील राष्ट्रवादीच अस्तिव हे आता संग्राम जगताप यांच्या हाहात आहे. त्यांनी जर शिवसेनेत प्रवेश केला तर नगर मधून राष्ट्रवादी जवळपास हद्दपार होणार आहे.

दरम्यान राष्ट्रवादी सोडण्याच्या तयारी असलेल्या नेत्यांची यादी माध्यमांकडे आली आहे. यामध्ये संग्राम जगताप, वैभव पिचड, राणाजगजितसिंह पाटील, अवधुत तटकरे, बबन शिंदे, संदीप नाईक, दिलीप सोपल, चित्रा वाघ, आणि शिवेंद्रराजे भोसले हे नेते देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचा तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!