टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अभिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीवर विरोधकांनी जोरदार टीका केली. तसेच शेतकरी कर्जमाफीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
शुक्रवारी सांगली शहरात राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी कर्जमुक्ती मेळावा पार पडला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणारच नसेल तर, ‘करून दाखवलं’, असे होर्डिंग लावले कशाला’, असा टोला त्यांनी सरकारवर लगावला.
पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्यांना होणार नसून ज्यांनी शेती सोडली आहे, अशा कर्जधारकांना होणार असाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. तसेच सरकारला या शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर, शेतकऱ्यांचे चालू पीक कर्ज माफ केले जावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.
दरम्यान, सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होणार नसेल तर, गावोगावी होर्डिंग लावण्यात काय अर्थ आहे, असा सवाल शेट्टी यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

