Share

‘लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे’

Published On: 

कागल – देशातील 18 वर्षावरील सर्वाच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एक रकमी धनादेश देऊन लस खरेदी करण्याची तयारी दाखवणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार ,रिक्षा चालक,टँक्सि चालक, मजूर केश कर्तनालय चे चालक, तसेच टाळेबंदी च्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे केली आहे.

देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे. असे स्पष्ट करून श्री घाटगे यांनी या निर्णयाबद्धल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस आर्थिक संकटात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज द्यावे अशी मागणी केली त्यांनी केली आहे.

केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एक रकमी धनादेश देऊन बारा कोटी मात्रा विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार ने उचलल्याचे या धनादेशाचा वाचलेला सुमारे सात हजार कोटीचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनते करता तातडीने वितरित करावा व गेल्या दीड वर्षापासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेला दिलासा द्यावा असे  समरजित सिंह घाटगे म्हणाले.

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेज ची दमडीदेखील अजूनही कोणाच्या खात्यात जमा झालेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ देऊ नका असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबवण्यासाठी राज्य सरकारने लसिकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे.व राजकारण न करता जनतेच्या जीवित रक्षणासाठी प्राधान्य द्यावे असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!