Share

मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर सेवक होऊन लढणार – संभाजीराजे छत्रपती

Published On: 

मुंबई : मराठा आरक्षणासाठी राजा म्हणून नाही तर समाजाचा सेवक म्हणून शेवटपर्यंत लढणार, असं वक्तव्य खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं आयोजित संघर्ष यात्रेच्या प्रसंगी ते बोलत होते.

मराठा आरक्षणाचा प्रश्न संसदेत योग्यपणानं लावून धरू. यासाठी सगळ्याच मराठी नेत्यांनी आरक्षणाचा मुद्दा उचलून धरावा. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहेत. अस संभाजीराजे म्हणाले आहेत.

दरम्यान, शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांच्या पुढाकाराने शनिवार पुण्यामध्ये मराठा आरक्षणाविषयी मराठा विचार मंथन बैठक पार पडली. मराठा समाजाच्या आरक्षणाविषयीचा पेच आणि समाजाच्या अन्य समस्यांमध्ये एकसूत्रीपणा आणण्यासाठी मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं.

या बैठकीसाठी मराठा आरक्षण आंदोलनातील विविध नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. उदयनराजे, शिवेंद्रराजे यांनाही वैयक्तिक आमंत्रण दिल्याचं विनायक मेटे यांनी सांगितलं. पण या नेत्यांपैकी कुणीही या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!