पुणे : मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संभाजी ब्रिगेडची येत्या ३० डिसेंबर रोजी मुंबईत बैठक होणार आहे. यात महापालिका निवडणुकीच्या पाश्वभूमिवर संघटनेची राजकीय भूमिका जाहीर केली जाणार आहे. एकूण किती महापालिकेत निवडणूक लढवायची आणि कोणत्या पक्षासोबत युती करायची यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
३० डिसेंबर रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात होणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात महत्वपूर्ण निर्णय होणार आहे. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते येणार असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला आहे. हा मेळावा म्हणजे संभाजी ब्रिगेडचं शक्तिप्रदर्शन असणार असल्याचंही सांगितलं जात आहे. या मेळाव्याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठा आरक्षण मोर्चानंतर संभाजी ब्रिगेड संघटनेत मोठ्या संख्येने युवक, कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संघटनेने महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यास राज्यभरातील मोठ्या पक्षांसाठी ही डोकेदु:खी ठरणार आहे.
पुढच्या वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान राज्यातील १५ महापालिका तर सुमारे १०० हून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनेही दंड थोपटले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …या दोन वर्षांत प्रकृती बिघडली ती राज्यातील विरोधी पक्षाची- संजय राऊत
- ‘विरोधी पक्षाची गेल्या दोन वर्षांतील अचिव्हमेंट काय?’, संजय राऊतांचे टीकास्त्र
- ‘कितीही संकटं येवोत, सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून राज्य सरकार काम करीत राहणार’
- हिंदूंची संख्या आणि ताकद कमी होत आहे- मोहन भागवत
- संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीसाठी शेतकरी नेते राकेश टिकैत झाले मुंबईत दाखल


