सांगली : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची पावले उचलली आहेत. विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच आठ दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबंधित करून कोरोना नियमांचे कडक पालन करण्याचे आवाहन केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यभरात देखील नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश दिले आहेत.
परंतु या सर्व नियमांना अनेक ठिकाणी केराची टोपली दाखवली जात आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचं उल्लंघन झालं आहे. सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी तोंडावर लावलेला मास्क त्यांनी काढायला लावला. यावेळी इतर कार्यकर्ते देखील विना मास्क आढळून आले.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे.शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या भूमिपूजन करण्यात येत होते. अनिल बाबर भूमिपूजन करत असताना भिडे यांनी त्यांना टोपी दिली. यानंतर बाबर यांना त्यांनी मास्क काढण्याची सूचना केली. आमदार बाबर यांनी संभाजी भिडेंच्या सूचनेप्रमाणं मास्क काढून ठेवला आणि भूमिपूजन केले.
राज्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण वाढत आहे. आळसंद येथील भूमिपूजन कार्यक्रमाला संभाजी भिडे आणि त्यांचे सहकारी विना मास्क जमलेले पाहायला मिळाले. सांगली जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोप्या शब्दात जाणून घ्या सोशल मिडिया बाबत काय आहेत नव्या गाईडलाईन्स ?
- सामाजिक बांधिलकी! धनंजय मुंडेंकडून ‘त्या’ चिमुकलीचा पहिला वाढदिवस साजरा
- मंगलाष्टके नव्हे तर ‘वंदे मातरम्’च्या सुरात जुळल्या अनाथांच्या रेशीमगाठी
- राठोडांसोबतच्या महंतांना झाली कोरोनाची लागण; मुख्यमंत्र्यांनी गमावला सर्वसामान्यांचा विश्वास
- जिल्हा मध्यवर्ती बँकासह सहकारी संस्थाच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

