Share

समांथा साकारणार ‘बायसेक्सुअल’ भूमिका ; पोस्ट शेअर करत केला खुलासा

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा (Samantha Ruth Prabhu) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. समांथांने ‘फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. समांथा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून समांथा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. आता समांथा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आगामी प्रोजेक्ट एकदम हटके असून याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केला आहे.

आता सामंथा रुथ प्रभू  ‘ऍरेंजमेंट ऑफ लव्ह’ ( ‘Arrangement of Love’.) या चित्रपटात एका ‘बायसेक्सुअल’ महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट एका कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटातील तामिळ बायसेक्सुअल महिलेची भूमिका साकारणार आहे. दरम्यान समांथाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. मात्र, यावेळी समांथाच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एक संपूर्ण नवीन जग…मी २००९ मध्ये ‘ये माया चेसवे’ या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

https://www.instagram.com/p/CWuY4rRBnCr/?utm_source=ig_web_copy_link

आता तब्बल १२ वर्षानंतर पुन्हा एकदा ऑडिशन देताना मी तितकीच अस्वस्थ होते. मात्र दररोज तुम्ही काही BAFTA पुरस्कार विजेता आणि आपल्या आवडत्या ‘Downton Abbey’ आणि ‘The Good Karma Hospital’ सीरिजच्या दिग्दर्शकाला भेटने म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे. मला ही संधी दिल्याबद्दल तुमचे आभार आणि या नवीन प्रवासासाठी मी खूप उत्साही आहे, असे कॅप्शन समांथाने दिले आहे. समंथा ‘ऍरेंजमेंट ऑफ लव्ह’ या चित्रपटात यानंतर एस.एस राजामौली (SS Rajamouli) ,यांचा ‘ईगा’( ‘Iga’), ‘सुपर डिलक्स’, ‘जनाथा गॅरेज’ आणि ”मेर्सला’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल तिच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाचे काही पहा फोटो.

 

 

महत्त्वाच्या बातम्या

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!