Share

‘या’ ठिकाणी आहे ‘देवमाणूस’ मधील डॉ.अजित कुमारचा पुतळा; पाहून बसेल धक्का

Published On: 

मुंबई : चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ( Devmanus)  ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतलं. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) यांनी बोगस डॉक्टर ही भूमिका चांगलीच वठविली होती. मात्र या मालिकेतील डॉ.अजित कुमारांचा अर्ध पुतळया आपल्या परिसरात पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे.

चक्क कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी ‘देवमाणूस’ मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले. आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना आश्चर्य वाटले, त्यामुळे लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. दरम्यान ‘देवमाणूस ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता आणि त्यानांतर प्रेक्षक व चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची. नुकतंच या मालिकेचा टीझर प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांमध्ये या नवीन भागाबद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं.

विशेष म्हणजे लोक या पुतळ्यासोबत सेल्फी काढून मालिकेविषयी आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग (Dr. Ajikmumar dev) जिवंत आहे की मेला आहे? हा आणि असे अजून प्रश्न प्रेक्षकांसमोर आहेत. याची उत्तरे लवकरच त्यांना मिळतील. डिसेंबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हे पर्व प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा चर्चेच कारण बनत आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!