Share

सलमान खान फिल्म इंडस्ट्रीतील 25 हजार मजुरांच्या बँक खात्यात जमा करणार पैसे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात (22 एप्रिल) संध्याकाळी आठपासून ब्रेक द चेन अंतर्गत अधिक कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे कडक निर्बंध असणार आहेत. राज्यात सध्या कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आणखी नियम कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद राहतील. सिनेमा आणि टीव्ही मालिकांचे शूटिंगही बंद राहणार आहे.

अशातच बॉलिवूड अभिनेता सलमान खानने पुन्हा एकदा कोरोनाच्या दुसऱ्या आणि धोकादायक लाटेच्या पार्श्वभूमीवर सिनेसृष्टीतील 25 हजार मजुरांना मदत करण्याची घोषणा केली आहे.

सलमान खानने 25 हजार कामगारांच्या बँक खात्यात 1500 रुपये प्रत्येकी असे एकूण 3.75 कोटी रुपये देऊन मदत करण्याचा निर्णय सलमान खानने घेतला आहे. फेडरेशनच्या वतीने मागील वर्षी सलमान खानला 26 हजार गरजू कामगारांची आधार कार्ड, पॅनकार्ड आणि बँकेचा तपशील पाठविला होता.

त्याच्याकडे आधीपासून असलेल्या या नावांपैकी सलमान खानने एकूण 25 हजार लोकांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. यांत लाईटमॅन, स्पॉटबॉय, मेक-अप आर्टिस्ट, स्टंटमॅन, ज्युनियर आर्टिस्ट यांचा समावेश असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!