🕒 1 min read
मुंबई : लॉकडाऊनमुळे सर्व चित्रपट आणि मालिकांचेही चित्रिकरण बंद पडलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो मजुरांचं मोठं नुकसान झालं आहे. या क्षेत्रातील हजारो मजुरांचं हातावरती पोट आहे. त्यामुळे अशा कामगारांना मदत करण्याची घोषणा बॉलिवूड अभिनेता सलमान खानने केली होती.
याच पार्श्वभूमीवर सलमान खानने मंगळवारी16,000 कामगारांच्या बँक खात्यात एकूण 4 कोटी 80 लाख रुपये ट्रान्सफर केले आहेत. सलमान मे महिन्यात आणखी 19,000 कामगारांना मदत करणार आहे. असं वृत्त tv9मराठी ने प्रसिद्ध केलं आहे.
सलमान खान फिल्म प्रोडक्शनने फेडरेशन ऑफ वेर्स्टन इंडिया सिने इम्प्लॉयीजचे सचिव अशोक दुबे यांच्याजवळ चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या मजुरांचे बँक अकाउंट नंबर मागितले होते. यापैकी 19000 कामगारांच्या बँक अकाउंट संदर्भातील माहिती सोमवारी संध्याकाळी देण्यात आली.
तसेच सलमानच्या ऑफिसमध्ये या कामगारांच्या बँक अकाउंटची माहिती मिळताच संपूर्ण टीम तातडीने कामाला लागली. टीमने आज संध्याकाळपर्यंत 16000 कामगारांच्या अकाउंटमध्ये प्रत्येकी 3000 रुपये जमा केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
