Share

या दोन अटींवर सलमानला जामीन मंजूर

Published On: 

जोधपुर: काळवीट शिकारी प्रकरणी पाच वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जामीन मंजूर करण्यात आला आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी असल्याचा निकाल जोधपुर न्यायालयाने दिला होता, त्यानंतर त्याची रवानगी कारागुहात करण्यात आली होती. दरम्यान सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी करणारे न्यायाधीश आर के जोशी यांची बदली करण्यात आल्याने जामिनावर मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता, मात्र जोशी यांच्याच समोर सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली.

सलमानला दोन अटींवर जामीन
सलमान खानला जामीन मंजूर करताना, कोर्टाने दोन अटी घातल्या आहेत.

  1. सलमानला 7 मे रोजी कोर्टात यावं लागेल.
  2. देश सोडण्यापूर्वी कोर्टाची परवानगी घ्यावी लागेल.

दरम्यान ८७ न्यायाधीशांची बदली करण्यात आली होती. यामध्ये सलमान खानला शिक्षा सुनावणारे आणि जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली. त्यामुळे सलमानला जमीन मिळणार की नाही ? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर त्याला जमीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी जोधपूर न्यायालयात सलमानच्या वकिलांसोबत त्याची बहीण अल्विरा आणि अंगरक्षक शेरादेखील उपस्थित होता.

काय आहे प्रकरण ?
कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने १९९८ मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!