मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे अधिवेशन नागपुरातच घ्यावे तसेच कालावधी वाढवून द्यावा अशी, मागणी त्यांनी केली आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली यावेळी शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली. केवळ ५ दिवसांच्या अधिवेशनाचा निर्णय झाला आहे. अधिवेशन कालावधी वाढविला जावा, अशी आम्ही मागणी केली. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली.
केवळ ५ दिवसांच्या अधिवेशनाचा निर्णय झाला. अधिवेशन कालावधी वाढविला जावा, अशी आम्ही मागणी केली. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा बैठक घेऊन अधिवेशन कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात येईल : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis https://t.co/0gcnmUHaf1— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) November 29, 2021
२० ते २५ डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असे मंत्रिमंडळाने जाहीर केले होते. अधिवेशन केवळ ४ ते ५ दिवसांचे घेण्यात येणार आहे. पहिला दिवस केवळ शोक प्रस्तावात जातो, त्यामुळे यंदाचे अधिवेशनही केवळ ४ दिवसांचे आहे. हा कालावधी वाढविण्यात यावा अशी आमची मागणी होती, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’

