Share

…ते सर्व पुरावे आम्ही कोर्टासमोर ठेऊ- नवाब मलिक

Published On: 

मुंबई : भाजपा नेते मोहित कंबोज(Mohit Kamboj) यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांनी माझगाव न्यायालयात हजेरी लावली.

यावेळी बोलत असतांना मलिक म्हणाले की,’न्यायालयात आमच्या आणि त्यांच्या वकिलांकडून काही गोष्टी मांडण्यात आल्या. कोर्टाने विचारले तुमच्यावरील अब्रुनुकसानीचा आरोप तुम्हाला मान्य आहे का? मी हे आरोप अजिबात मान्य नसल्याचं सांगितलं. मी हे आरोप मान्य करायला अजिबात तयार नाही. मी जे काही सांगितले त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. ते सर्व पुरावे आम्ही कोर्टासमोर ठेऊ’, तसेच आमच्या वकिलांनी न्यायालयाच्या रेकॉर्डवर ही व्यक्ती फ्रॉड असल्याचा मुद्दा आणला आहे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, पुढे मलिक म्हणाले की,’आमच्या वकिलांनी मोहित कंबोज यांचा ११०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं प्रकरणही न्यायालयासमोर ठेवलं आहे. तसेच त्यांच्यावरील सीबीआय छाप्यांचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांनी नाव बदलून आपली ओळख लपवली आहे. आधी नाव मोहित कंबोज होते, मात्र घोटाळा समोर यायला सुरुवात झाल्यावर त्यांनी स्वतःचं नाव मोहित भारतीय ठेवलं. आम्ही या सर्व गोष्टी न्यायालयाच्या समोर मांडल्यात.’

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!