नवी-दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार करून फरार झालेल्या उद्योगपती मेहुल चोक्सीने(Mehul Choksi) पुन्हा एकदा आपले अपहरण केले जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. डोमिनिकात २३ मे रोजी अवैधरित्या प्रवेश केल्याने मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली होती. यावेळी त्याने भारतीय अधिकाऱ्यांनी आपले अपहरण करुन आणल्याचा दावा चोक्सीने केला होता.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत चोक्सी म्हणाला आहे की, ‘माझ्यावर पुन्हा एकदा जबरदस्ती करत अपहरण करत गयावा येथे नेलं जाऊ शकतं, गयावा येथे भारताचे चांगले संबंध असून त्याचा फायदा घेत बेकायदेशीरपणे मला नेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.’ तसेच मी सध्या अँटिग्वामधील माझ्या घरात असून प्रकृती नीट नसल्याने मी कुठेही जाऊ शकत नाही. भारतीय अधिकाऱ्यांमुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे माझी प्रकृती अजूनच खालावली, असा आरोपही यावेळी त्याने केला आहे.
दरम्यान, पुढे बोलत असतांना चोक्सी म्हणाला की,’मागील काही महिन्यांमध्ये बसलेले मानसिक धक्के, सतत मनात असलेली भीती मला सध्या मदतीची गरज आहे. डॉक्टरांनी सल्ला दिल्यामुळे मी घराबाहेर पाय ठेवू शकत नाही आणि प्रकाशझोतात येण्यापासून स्वत:ला दूर ठेवतो. माझ्या प्रकृतीमुळे मला काही करायला जमत नाही.’ तसेच माझे वकील अँटिग्वा आणि डोमनिकामध्ये केस लढत असून न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे’, असेही त्याने सांगितले.
महत्वाच्या बातम्या:
- …तर आरोग्याची बंधने पाळावीच लागतील- मुख्यमंत्री ठाकरे
- दक्षिण आफ्रिकेतून स्वदेशी परतलेल्या व्यक्तीला नव्या व्हेरिएंटचा संसर्ग?
- कायदे मंजूर करताना परिणामांचा विचार न केल्याने समस्या- एन.व्ही.रमण
- …तर राजकीय विरोधकांवर टीका हाच एकमेव कार्यक्रम कसा ठरू शकतो?- संजय राऊत
- ‘काँग्रेसची सूत्रे गांधी घराण्याकडे असणे व भाजपची सूत्रे पंतप्रधानांच्या मुठीतल्या व्यक्तीकडे असणे हे सारखेच’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

