Share

LFW मध्ये सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देश – फॅशनच्या दूनियेत सध्या सई ताम्हणकर सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. लव सोनिया सिनेमामूळे तर आता सई ताम्हणकर ग्लोबली प्रसिध्द झाली आहे. त्यामूळे अर्थातच यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सई ताम्हणकरला एक नाही, दोन नाही तर तीन-तीन डिझाइनर्सकडून आमंत्रण आले होते.

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह ह्या तीन डिझाइनर्सच्या रविवारी झालेल्या फॅशन शोजना सईला विशेष आमंत्रण होते. आणि ह्या तीन डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजना सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले.

पुनीत बलानाच्या शोमध्ये सई मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमूळे तिचा एलिगन्ट लूक दिसून येत होता. सईच्या ह्या बोहो-चीक लूकमूळे ती फॅशन शोला आलेल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती.

पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटीलचाही फॅशन शो अटेंड केला. ह्या शोला सई थ्री पीस लुक मध्ये दिसली. ज्यामध्ये सईने लव्हेंडर कलरचा क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि एम्ब्रॉडरी केलेलं जॅकेट घातलं होतं. सईच्या ह्या लुकला खूप प्रशंसा मिळाली. अशावेळी पॅपराझी झाली नसती तरच नवलं. लॅक्मे फॅशन शोच्या रेडकार्पेटवर सईचा हा लूक हिट असल्याचं फॅशन फोटोग्राफर्सच्या न थांबणा-या क्लिक-क्लिकने दिसून आले.

जुली शाहच्या ‘अबजीनी’ कलेक्शन असलेल्या फॅशन शोला येताना सईने पेस्टल पींक कलरचा धोतीकट जम्पसूट घातला होता. न्यूड लिपस्टिक, न्यूड हिल्स आणि फक्त गोल्डन बँगल्समूळे ह्या लूकला एक वेगळंच ग्लॅमर आलं. सईच्या ह्या स्टनिंग इव्हिनिंग लूकमूळे ती फॅशन ब्लोगर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!