Share

लव सोनियाच्या चित्रीकरणावेळी सई ताम्हणकरला आले होते फ्रस्ट्रेशन

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- तबरेज नुरानी दिग्दर्शित लव सोनिया सिनेमामध्ये सई ताम्हणकर अंजली ह्या देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बाईच्या भूमिकेत आहे. ह्या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी सईला खूप मानसिक ताण आला होता. ती ही भूमिका रंगवताना ब-याचदा फ्रस्ट्रेट झाली आहे.

खऱ्या आयुष्यात देखील राणा एकही दिवस चुकवत नाही ही एक गोष्ट.

सई ताम्हणकर म्हणते, “ह्या सिनेमामूळे देहविक्रयाच्या व्यवसायातल्या बायकांच्या व्यथा मला ख-या अर्थाने कळल्या. इथे पकडून आणलेल्या लहानमुलांना कसं गुलाम बनवलं जाते, ते कळले. त्यांना छोट्या पिंज-यात दोन-दोन दिवस अन्न-पाण्याविना बंद करून ठेवतात. हे सगळं अंगावर येणारं. प्रचंड मानसिक वेदना देणारं होतं.”

आता “बॉयफ्रेंड” मिळणार भाड्याने….

सई पूढे सांगते, “लव सोनियातली अंजली मुली पूरवण्याचं काम करते. ती सतत नकारात्मक वातावरणातच राहते. त्याचा अर्थातच कळत-नकळत माझ्याही मनावर परिणाम झाला. मला ही भूमिका रंगतवाताना खूप फ्रस्टेशन यायचे. माणसं एवढी कशी वाईट असू शकतात? मी एखाद्या व्यक्तिशी किती वाईट वागतेय? असं वाटायच”

ह्या फ्रस्टेशनमधून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी सईने म्युझिक थेरपीचा आधार घेतला. ती म्हणते, “संगीत एक खूप चांगले औषध आहे. आनंददायी संगीत तुम्हांला मानसिक ताणातून बाहेर आणायला. खूप मदत करतं.”

ऐकावे ते नवलचं… एलियनचा सांगाडा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!