टीम महाराष्ट्र देशा : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी राहिलेल्या आणि सध्या मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभेच्या जागेवरील भाजपच्या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटले आहे की, त्यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसविले. मी त्यांना म्हटले होते की तुमचा सर्वनाश होईल आणि ते आपल्या कर्मांने मेले. त्यांच्या या वक्तव्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
मात्र, भाजपने या वादापासून आपले हात वर करत साध्वीला झालेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासातून त्यांनी हे वक्तव्य केल असावं, भाजप शहीद हेमंत करकरे यांचा कायम सन्मान करते असे भाजपने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटल आहे.

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर ही हेमंत करकरे विषयी बोलताना म्हणाल्या की, मी हेमंत करकरे यांना तुझा सर्वनाश होईल असा शाप दिला होता आणि २१ दिवसातच मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. असे तथ्यहीन वक्तव्य केल्याने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या वर टीका होत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

